Kirit Somaiya :'सोमय्या जवाब दो',राष्ट्रवादी काँग्रेसची किरीट सोमय्यांच्या विरोधात मोहीम सुरु
राष्ट्रवादी काँग्रेस किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक झालीय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने 'सोमय्या जवाब दो' ही मोहीम सुरु केलीय. गेल्या काही वर्षात सोमय्या यांनी सध्या भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर देखील भ्रष्टाचाराचे विविध आरोप केले होते. त्यांच्याबाबत पुढे काय झाले याबाबत प्रश्न विचारणारे बॅनर मुंबईत लावण्यात आलेत.