NCP vs NCP: स्थानिक निवडणुकीसाठी Ajit Pawar गटाचा ३-सूत्री फॉर्म्युला; महायुतीला पहिले प्राधान्य

Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांनी युतीच्या शक्यतांवरून एकमेकांना टोले लगावले आहेत. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या. ‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जर प्रस्ताव आला तर तो स्वीकारला जाईल अशी दूरदूर परिस्थिती नाहीये,’ असे थेट विधान अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. मिटकरी यांनी स्पष्ट केले की, स्थानिक निवडणुकीसाठी महायुती म्हणून लढण्याला त्यांचे पहिले प्राधान्य असेल, त्यानंतर स्थानिक पातळीवर भाजप किंवा शिवसेनेसोबत युती आणि तिसरा पर्याय स्वबळावर लढण्याचा असेल. याउलट, शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वैचारिक मतभेदांवर बोट ठेवले. महायुतीची विचारधारा शिवशाहू-फुले-आंबेडकरी विचारांची नसल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्याचे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola