BJP's Power Play: 'मित्रपक्षांची कोंडी'! शिंदे-पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची नवी रणनीती

Continues below advertisement
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मित्रपक्षांना शह देण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे. 'मित्र पक्षांशीच कोंडी करत स्वतःचा राजकीय फायदा करुन घेण्यासाठी प्रत्येकच पक्ष आता दडपड करताना पहायला मिळतेय'. भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बालेकिल्ल्यात आपल्या निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंचा गड असलेल्या ठाणे (Thane), कल्याण आणि नवी मुंबईत गणेश नाईक (Ganesh Naik) यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार गटाचे असूनही भाजपने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना निवडणूक प्रभारी बनवले आहे. त्याचबरोबर, नाशिकमध्ये (Nashik) छगन भुजबळ आणि दादा भुसे यांसारखे नेते असताना गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola