NCP Sharad Pawar : पक्षात भाकरी फिरवण्याची वेळ आली, Sharad Pawar यांच्या वक्तव्याने चर्चांना उधान
abp majha web team
Updated at:
27 Apr 2023 08:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल भाकरी फिरवण्याचे संकेत दिले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात भूकंपाचे संकेत मिळू लागले... एकीकडे शरद पवार यांनी पक्ष संघटने बाबत जरी हे वक्तव्य केलं असलं तरी मागील काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत सुरू असलेल्या घडामोडी पाहता हा सूचक इशारा भाजपसोबत जाऊ पाहणाऱ्या नेत्यांना तर नाही ना अशी देखील एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे...त्यामुळे पवारांचं हे विधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही गांभीर्याने घेतलंय...त्यामुळे आता राष्ट्रवादी भाकरी फिरवल्यानंतर कुणाला संधी मिळणार आणि कुणाला बाजुला करणार हे पाहावं लागेल