NCP Reshuffle: '…म्हणून पक्षातून काढलं', Ajit Pawar गटातून Amol Mitkari, Rupali Patil यांची हकालपट्टी

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठी संघटनात्मक फेरबदल करण्यात आली असून, अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली आहे. या नव्या यादीतून आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांना वगळण्यात आले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वारंवार पक्षविरोधी भूमिका आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरील टीकेमुळे रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर कारवाई झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, भाजपवर (BJP) सातत्याने टीका करणारे अमोल मिटकरी यांनाही पदावरून दूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी मारहाण प्रकरणी वादात सापडलेल्या सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांना पुन्हा प्रवक्तेपदी संधी देण्यात आली आहे. याशिवाय, आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola