NCP : वाद भोवला! रुपाली ठोंबरे, अमोल मिटकरींची प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटात मोठी संघटनात्मक खांदेपालट झाली असून, रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना प्रवक्तेपदावरुन हटवण्यात आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर जाहीर टीका करणे रुपाली ठोंबरे पाटील यांना भोवल्याचे मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केलेल्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीत सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्यासह १७ जणांना संधी देण्यात आली आहे, तर जुन्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले अमोल मिटकरी यांचेही नाव नव्या यादीतून वगळण्यात आले आहे. मिटकरी यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत २०२६ मध्ये संपणार आहे, त्यापूर्वीच पक्षाने ही कारवाई केली आहे. या फेरबदलामुळे रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातील पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola