NCP Protest :पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरी हल्ला केल्यानंतर त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करून हल्ल्याचा निषेध केला. पुणे, सोलापूर, बुलढाणा, जळगाव, कल्याण, अकोला आदी ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन आणि घोषणाबाजी केली. पवारांच्या घरावर झालेला हल्ला दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली. या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून आजही ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola