Nagpur : चंद्रशेखर बावनकुळेंच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात नागपुरात राष्ट्रवादीचं आंदोलन
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना भोंदू बाबा म्हणत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत आंदोलन केले. नागपूरच्या चितार ओळी परिसरात गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केले. हातात निषेधाचे बॅनर घेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानी रोष व्यक्त करत जोरदार घोषणा दिल्यात. यावेळी बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करण्यापूर्वी एकनाथ शिंदेना शिवसेनेतून बाहेर काढत स्थापन केलेले सरकार जादूटोणा करून केले का? असा सवाल राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी उपस्थित केला. तसेच या वक्तव्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे पोलीस स्टेशनला जाऊन जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचेही सांगितलं.