NCP On Dhananjay Mudne Resign : धनंजय मुंडेचा राजीनामा नैतिकतेला धरुन, राष्ट्रवादीची भूमिका जाहीर
NCP On Dhananjay Mudne Resign : धनंजय मुंडेचा राजीनामा नैतिकतेला धरुन, राष्ट्रवादीची भूमिका जाहीर
श्री. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे पत्रक जारी करत आहोत:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रारंभापासूनच अशी स्पष्ट भूमिका राहिली आहे की संतोष देशमुख हत्याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे, बीडसह संपूर्ण राज्यभरातील आमच्या पक्षाच्या नेत्यांनी याबाबत अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे.
आज श्री. धनंजय मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याच्या निर्णय हा नैतिकतेला धरून आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा आहे.
हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे. श्री. धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे.