Sunil Tatkare on Nisarg | रायगड जिल्ह्याला कोणतेही निकष न ठेवता मदत करावी : सुनिल तटकरे
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण विभागात मोठं नुकसान झालं आहे. महावितरणचे विजेचे खांब पडल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रायगड जिल्ह्यात झाडे रस्त्यावर कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत. यावर रायगड जिल्ह्याला कोणतेही निकष न ठेवता मदत करावी, अशी मागणी सुनिल तटकरे यांनी केली आहे.