Rohit Pawar : 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी देण्याची 'झोमॅटो'ची घोषणा म्हणजे जीवाशी खेळ ABP Majha

Continues below advertisement

ऑनलाईन नोंदणीवरून अन्नपदार्थ पोहचवणाऱ्या झोमॅटोनं आता १० मिनिटांत डिलिव्हरी करण्याची घोषणा केलीय. आधी ३० मिनिटांत डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोनं आता अवघ्या १० मिनिटांत अन्नपदार्थ घरपोच देण्याचा वायदा केला असला तरी या निर्णयावर आक्षेपही घेतला जातोय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिलीय. १० मिनिटांत फूड डिलिव्हरी देण्याची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ असल्याची टीका रोहित पवार यांनी केलीय. डिलिव्हरी करणारी मुलं गरीब कुटुंबातील आणि विद्यार्थीही असतात. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं आवश्यक असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram