NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी पक्षांतर्गत निवडणुकीचे पुरावे कपाटातून गायब - आव्हाड
NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी पक्षांतर्गत निवडणुकीचे पुरावे कपाटातून गायब - जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणीत आज जितेंद्र आव्हाड यांची साक्ष सुरू आहे. अजित पवार गटाचे वकील शरण जगतीयानी जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीचे पुरावे कपाटातून गायब झाले अशी साक्ष आव्हाडांनी दिलीय. हे गोपनीय कागदपत्र कपाटात होते. त्याची जबाबदारी दोघांवर होती, ते दोघेही पक्ष सोडून गेलेत असं आव्हाड म्हणाले. त्यांनी या पुराव्यांचं काय केलं माहिती नाही असं आव्हाड म्हणाले.