NCP Legal Battle : शिवसेनेप्रमाणं राष्ट्रवादीतही पक्ष, नाव आणि चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरू

Continues below advertisement

शरद पवार गटातर्फे निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवार गटाने केलेले सगळे दावे फेटाळण्यात आले आहेत.  महत्त्वाचं म्हणजे ९ मंत्र्यांसोबत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या ३१ आमदारांच्या विरोधात सुद्धा अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये ४ विधान परिषदेच्या आमदारांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळतेय. निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. दोन्ही बाजूची उत्तर ऐकल्यानंतर आयोग किती वेगाने सुनावणी करतो ते पाहावं लागेल. मात्र एकूणच, शिवसेनेप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील पक्ष, नाव आणि चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरू झाली आहे, असंच म्हणावं लागेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram