Sushant SIngh Rajpur Suicide Case | सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशी करा, पार्थ पवारांची मागणी

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी आज मंत्रालयात गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. पार्थ पवार यांनी गृहमंत्र्यांनी पत्र दिले, या पत्रात पार्थ यांनी सुशांत सिंग प्रकरणी यूपी,बिहार सारख्या राज्यातून अनेक तरुणांचे फोन आले,या प्रकरणात आपण काही तरी करावे, न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली म्हणून या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देण्यात यावा अशी मागणी केली आहे. पार्थ पवार यांनी हे पत्र लिहिल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली की गृहखाते हे राष्ट्रवादीकडे आहे, गृहमंत्री देखील राष्ट्रवादीचे आहेत असं असूनही पार्थ पवार यांनी सीबीआयकडे चौकशीची मागणी केली. मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का अशीही यानिमित्ताने चर्चा सुरू झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram