Anil Parab on ST : आंदोलनात वेळ घालवू नका, कर्मचाऱ्यांनी कामावर परतावं, परिवहन मंत्र्यांचं आवाहन
Continues below advertisement
ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होत चालला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं की, कोर्टानं दिलेल्या निर्देशाप्रमाणे कमिटी नेमली आहे. कर्मचाऱ्यांची मागणी कमिटीपुढे जाऊन मांडावी लागेल. कमिटी जो अहवाल देईल तो सर्वांना लागू असेल. इन्क्रिमेंटची मागणी वगळता माझ्या अखत्यारितील मागण्या मान्य झाल्या आहे. कोर्टानं संप बेकायदेशिर ठरवलाय. कामगार राजकीय बळी ठरले तर ते दुर्दैवी असेल, असं परब म्हणाले.
Continues below advertisement