Sharad Pawar Meets PM Modi : शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबतची भेट बँकिंगमधील समस्यांबाबत : नवाब मलिक

Continues below advertisement

 राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं की, शरद पवार आणि नरेंद्र मोदी भेटीवरून चुकीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र या भेटीनंतर सुरु झालेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही, असं नवाब मालिक यांनी म्हटलं. केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे सहकारी बँकांना मोठं नुकसान होत आहे. रिझर्व्ह बँकेला खूप अधिकार देण्यात आले आहेत. सहकारी बँकेतून एखादा व्यक्ती कर्ज घेतो, त्यावेळी महाराष्ट्रातील कायद्यानुसार अडीच टक्के शेअर कॅपिटल त्यांना घ्यावा लागतो. पण कर्ज परत केल्यानंतर आपली शेअर कॅपिटलची रक्कम परत मिळावी अशी त्याची अपेक्षा असते. पण नव्या नियमांनुसार ती परत मिळू शकत नाही. यामुळे एखादा उद्योजक सर्व शेअर खरेदी करून बँकेवर कब्जा करू शकतो. नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा आली आहे. याविषयीचं निवेदन पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं. याविषयी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन मोदींनी शरद पवार यांनी दिलं आहे. नियमांतील बदलांमुळे सहकार बँकांना धोका आहे. याविषयी पंतप्रधानांसोबत फोनवर चर्चा झाली होती. आणि आज त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली, असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या भेटीबाबतची कल्पना होती.  पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची भेट केवळ बँकिंगमधील समस्यांबाबत होती, याची काँग्रेस नेत्यांनाही कल्पना आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram