Pandharpur : पायी वारीचा वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता तर बरं झालं असतं : एकनाथ खडसे
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थांच्या वतीने दर वर्षी संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असते यामध्ये हजारो दिंड्या पालख्या आणि वारकरी मोठ्या भक्ती भावाने सहभागी होत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीवर बंधन आले असून त्याऐवजी मोजक्याच वारकऱ्यांच्या सह ही वारी बसमधून पंढरपूरकडे रवाना केली जात आहे.
यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वारीला पायी जाण्यास परवानगी न मिळाल्याने वारकऱ्यांच्या मध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोथळी या गावी असलेल्या संत मुक्ताबाई समाधी स्थळवरून संत मुक्ताबाईंची मानाची पालखी पंढरपूरकडे रवाना होत असते अतिशय मानाच्या असलेल्या या पालखीचा साडेसातशे किलोमीटर चा प्रवास 34 दिवसांत पूर्ण होत असतो. या काळात ही अनेक गावात मुक्काम करीत जात असल्याची आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या कडून मुक्ताई पादुकांच दर्शन घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही मुक्ताई पालखीला पायी जाण्यास परवानगी मिळाली नसली तरी वारीला खंड पडू नये म्हणून शंभर वारकऱ्यांच्या मध्ये बसणेही वारी नेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मात्र कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता सर्व पातळ्यांवर नियम शिथिल केले गेले असल्याने पायी वारीला ही परवानगी मिळेल अशी शक्यता वर्तविली जात असताना अशा प्रकारची परवानगी न मिळाल्याने, गाव पातळीवर मुक्ताई पादुकांचं दर्शन घेता येणार नसल्याने वारकऱ्यांच्या मध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळाले होते.
बसने कमी लोकांत परवानगी दिली जाते तशी पायी जाताना सुद्धा कमी लोकांमध्ये शासनाने परवानगी द्यायला हवी होती, अशी मागणी वारकऱ्यांची होती असा प्रस्ताव ही वारकऱ्यांच्या वतीने शासनास देण्यात आला होता मात्र त्यास परवानगी मिळाली नाही. मुक्ताई नगर येथून निघणाऱ्या संत मुक्ताबाई वारीची अनेक वर्षांची परंपरा पाहता आणि वारकऱ्यांची मागणी पाहता वारकऱ्यांच्या हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असता तर अधिक बरे झाले असते असं म्हणत राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी वारकऱ्यांची बाजू घेतली असल्याचं पाहायला पाहायला मिळाले आहे.