राजू शेट्टींना दिलेला शब्द राष्ट्रवादीने पाळला, शेट्टींच्या नावाबाबत राज्यपाल निर्णय घेतील: शरद पवार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवार एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांना राजू शेट्टींच्या नावाबाबत प्रश्न विचारण्यात आला. ते नाराज असतील, तर त्याबाबत काही म्हणायचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी यादी राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यावतीने दिली आहे, त्यात राजू शेट्टी यांचे नाव आहे. राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे, ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटते की, अशा प्रकारची विधान कशी केली जातात. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणाने केले आहे. राजू शेट्टींनी काय वक्तव्य केले त्यावर भाष्य करायचे नाही. दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.