NCP Hearing Update : राष्ट्रवादीच्या आजच्या सुनावणीत काय झालं?
निवडणुकीत आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत सुनावणी पार पडली. अजित पवार गटानं आयोगावा हजारो खोटी प्रतिज्ञापत्रं सादर केली, असा आरोप आज शरद पवार गटानं पुन्हा एकदा केला. अजित पवार गटावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी देखील करण्यात आली. बनावट कागदपत्रांची आम्ही २४ प्रकारांमध्ये वर्गवारी करून आयोगासमोर सादर केली आहेत, असं शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं. यावरून दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीला अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार देखील उपस्थित होते.
Tags :
Sharad Pawar Abhishek Manu Singhvi Election Commission Ajit Pawar Criminal Case NCP Hearing False Affidavits