Maharashtra Politics: भाजपला सोडून कुणाशीही युती चालेल; Sharad Pawar यांच्या भूमिकेनंतर Chandgad मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र.

Continues below advertisement
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलत आहेत. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांनी एकत्र येत भाजपविरोधात आघाडी स्थापन केली आहे. जळगावातही अशाच प्रकारच्या युतीसाठी शरद पवार गट सकारात्मक असल्याचे चित्र आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली, 'तो आम्ही आदरणीय सूचनेप्रमाणे भाजप सोडून बाकीच्या ठिकाणी कुठेही आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेत असाल, तो घेण्याचा अधिकार आम्ही त्या त्या असलेल्या जिल्ह्यातील प्रमुखांना त्या त्या मतदारसंघातल्या प्रमुखांना दिलेला आहे.' महायुती म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न असला तरी, स्थानिक पातळीवर नेत्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola