MVA Alliance Talks: 'MNS सोबत युतीचा प्रस्ताव नाही', Congress प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण

Continues below advertisement
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यात संभाव्य युती होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः नाशिकमधील स्थानिक नेत्यांनी युतीची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मनसेबरोबर युतीसंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि त्यामुळे चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही, यावर इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) सर्व घटक पक्ष मिळून निर्णय घेतील,' असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठामपणे सांगितले आहे. नाशिकमध्ये झालेल्या बैठकीशी काँग्रेसचा संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबतचा संभ्रम कायम आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola