Pawar Politics: Pimpri-Chinchwad मध्ये Ajit Pawar गटाचा Sharad Pawar गटाला प्रतिसाद
Continues below advertisement
पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटांमध्ये युतीचे संकेत मिळत आहेत. आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केलेल्या सूचक विधानानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे (Tushar Kamte) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष योगेश बहल (Yogesh Behl) यांनी एकत्र निवडणूक लढवण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. 'दोन राष्ट्रवादी लढण्यापेक्षा एक राष्ट्रवादी कधीही चांगली, एक कुटुंब एकत्र येत असेल तर त्यापेक्षा मोठा आनंद काय असणार?,' असे म्हणत योगेश बहल यांनी आघाडीला पाठिंबा दिला आहे. भाजपला (BJP) शहरात रोखण्यासाठी दोन्ही गट एकत्र येण्यास तयार असल्याचे चित्र आहे, मात्र अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement