karuna Munde Meet Supriya Sule: करुणा मुंडेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट, महापालिका लढवणार

Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. करुणा मुंडे यांनी त्यांच्या स्थानिक शक्ती सेना पक्षाच्या वतीने निवडणुका लढवण्याची घोषणा करत सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायत निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'भाजप सोडून बाकीच्या ठिकाणी कुठेही आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेत असाल, तो घेण्याचा अधिकार आम्ही त्या त्या असलेल्या जिल्ह्यातील प्रमुखांना त्या त्या मतदार संघातल्या प्रमुखांना दिलेला आहे,' असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे राज्यभरात इतर ठिकाणीही अशा आघाड्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola