NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी,Jitendra Awhad यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांचीही बोगस प्रमाणपत्र जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार (Sharad Pawar) गटाने केला आहे. शरद पवार गटाच्या अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना हा दावा केला आहे.
राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, पक्षावर दावा कुणाचा याची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरू असलेल्या सुनावणीसाठी शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करत आहेत.
शरद पवार स्वतः या सुनावणीसाठी उपस्थित असून त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत. तर अजित पवार गटातर्फे पार्थ पवार निवडणूक आयोगात उपस्थित आहेत.
Continues below advertisement