Sharad Pawar |पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यासाठी आग्रह करणार: शरद पवार

Continues below advertisement

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही, मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यासाठी आग्रह करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. मराठवाड्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या झळा सोसतोय. या पार्श्वभूमीवर शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

अतिवृष्टीच्या संकटाला महाराष्ट्र तोंड देत आहे. काही जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही.  पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहे. पिक विम्यासंदर्भात शिथिलता करण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार. हा प्रश्न खूप मोठा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी. केंद्र व राज्य सरकार दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा, असे शरद पवार म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram