Pune Rain Updates | पुण्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणे घाटात ढगफुटीसदृश्य पाऊस

पुण्यापासून साधारणपणे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उरळी कांचन परिसरात रविवारी दुपारी ढगफुटी झाल्याने बाजारपेठेत मोठमोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे.

उरळी कांचनपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वळती घाटात रविवारी दुपारी चार ते संध्याकाळी सहा या वेळेत ढगफुटी झाल्याने वळती आणि शिंदवणे या गावात असलेल्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हे दोन्ही बंधारे फोडून पाण्याला वाट करुन देण्यात आली. त्यामुळे या गावांमधून उरळी कांचनला जाणाऱ्या ओढ्याला पुर आला. या पुरामुळे ओढ्याच्या काठावरील अवैध बांधकामं आणि अतिक्रमणांना मोठा फटका बसला. अनेक घरांमध्य पाणी शिरलं. पुढं हे पाणी उरळी कांचनमधे घुसलं आणि संपूर्ण शहरात पसरलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola