Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 17 OCT 2025 | ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शेतकरी पॅकेजच्या (Farmer Package) मुद्द्यावरून राज्यभर 'काळी दिवाळी' (Kali Diwali) आंदोलनाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे भाजपने (BJP) यावर जोरदार टीका केली आहे. 'ज्यांच्या कृषिमंत्रीपदाच्या काळामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या (Farmer Suicides) झाल्या, ते आता काळी दिवाळी साजरी करणार', अशा शब्दात भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीमध्ये राजकारण आणू इच्छित नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, सोलापुरात (Solapur) भाजपमध्ये मोठे इनकमिंग झाले असून, माजी उपमहापौर पद्माकर काळे (Padmakar Kale) आणि दिलीप कोल्हे (Dilip Kolhe) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याचबरोबर, राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement