Saamana Editorial वाद भाजप, शाह, मोदींशी, हिंदीशी नाही; स्टॅलिन यांना 'सामना'तून सल्ला;भाजपावर टीका

Continues below advertisement
इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) प्रमुख पक्ष असलेल्या DMK चे नेते एम. के. स्टॅलिन (M.K. Stalin) यांच्या हिंदी विरोधी धोरणावर शिवसेनेच्या (UBT) 'सामना' अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. 'स्टॅलिन यांचं भांडण मोदी-शहाशी आहे, ते भाषेशी नसावं,' असा थेट सल्ला देत 'सामना'ने स्टॅलिन यांना हिंदी भाषेवर राज्यात निर्बंध न लादण्याचं सुचवलं आहे. या निर्णयामुळे तमिळनाडू देशाच्या मुख्य प्रवाहापासून तुटेल आणि संवाद संपेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रातील भाजप सरकार 'हिंदी विरुद्ध इतर' असा वाद पेटवून राजकीय फायदा घेत असल्याचा आरोपही अग्रलेखात करण्यात आला आहे. मात्र, भाजपशी (BJP) वाद असले तरी स्टॅलिन यांनी देशभरात मुख्य संवाद भाषा म्हणून प्रचलित झालेल्या हिंदीवर बंदी घालणे योग्य नाही, असे 'सामना'मध्ये म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola