Ajit Pawar Tasgaon Speech | आर आर पाटलांनी केसाने गळा कापला तासगावमधील अजितदादांचे UNCUT भाषण
Ajit Pawar Tasgaon Speech | आर आर पाटलांनी केसाने गळा कापला तासगावमधील अजितदादांचे UNCUT भाषण
Ajit Pawar on R. R. Patil : "2004 सालं होतं, मला तरुणांना संधी देण्याची आवड होती. त्यावेळी आपला नेता कोण करायचा ते ठरलं. त्यामध्ये पद्मसिंह पाटील , विजयदादा , छगन भुजबळ , जयंत पाटील आणि आर आर पाटील होते. ते पाच जण उभे राहिले. या चार लोकांना इतकी कमी मतं पडली की ते म्हणाले आर. आरला जाहीर करुन टाका. मी सर्व मतं आर आरला मिळवून दिली. मला स्वत:ला नेता होता आलं असतं. मी म्हणालो नाही गरीब कुटुंबातील आहे. ग्रामीण भागातील आहे. शिक्षण फार कष्टाने घेतलेलं आहे. मग त्यावेळेस तो उपमुख्यमंत्री झाला. खरं तर मुख्यमंत्री झाला असता साहेबांनी का सोडलं माहिती नाही. साहेबांनी चार मंत्रिपद जास्त घेतले आणि मुख्यमंत्रिपद सोडून दिलं", असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते सांगलीत बोलत होते.