Meenal Sathye Nomination Madha : माढ्यात अजित पवारांच्या राष्ट्र्वादीकडून मीनल साठ्येंना उमेदवारी

Meenal Sathye Nomination Madha : माढ्यात अजित पवारांच्या राष्ट्र्वादीकडून मीनल साठ्येंना उमेदवारी
माढा विधानसभेची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार बनत चालली असून उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी माढ्याच्या नगराध्यक्षा व काँग्रेसच्या नेत्या मीनल ताई साठे यांनी अजित पवार गटातून उमेदवारी दाखल करीत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. मीनल साठे या माढ्यातून महाविकास आघाडी कडून उमेदवारीच्या प्रमुख दावेदार होत्या. यासाठी त्यांनी शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेत किमान एक महिलेला महाविकास आघाडीने तिकीट द्यावी अशी आग्रही मागणी केली होती.  मात्र शेवटच्या क्षणी ही उमेदवारी शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना दिल्यानंतर आता मीनल साठे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपली उमेदवारी अर्ज भरला आहे. या वेळेला अजित पवार गटाचे आमदार यशवंत तात्या माने हे उपस्थित होते. थोड्या वेळात मीनल साठे यांचा काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यात प्रवेश होणार असून साठे यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola