NCERT Controversy : NCERT च्या पुस्तकवर जैसलमेर घराण्याचा आक्षेप, पुर्वजांचा अवमान झाल्याचा आरोप
जैसलमेर घराण्याने एनसीईआरटीच्या आठव्या वर्गाच्या पुस्तकातील नकाशावर आक्षेप घेतला आहे. या नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवण्यात आले आहे. जैसलमेर घराण्याने याला पूर्वजांच्या बलिदानाचा अवमान आणि दिशाभूल करणारी बाब म्हटले आहे. राजघराण्याचे वंशज चैतन्य राज सिंग यांनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. इतिहास अभ्यासक सदानंद मोरेंनी यावर आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, "त्यांची मराठ्यांनी दखलही घेतली नव्हती आणि आज त्यांचे वंशज विरोध करतायत." जैसलमेर हे एक छोटे संस्थान होते. या नकाशातील माहिती तथ्यहीन असल्याचा दावा जैसलमेर घराण्याने केला आहे.