Sanjay Gaikwad on UBT : उबाठाचा बापही माझी कॉपी जमणार नाही, पलटवार करताना गायकवाडांची जीभ घसरली

वादात अडकलेल्या मंत्र्यांची नक्कल करून ठाकरेंच्या शिवसेनेने महायुतीच्या नेत्यांना डिवचले. बनियन आणि टॉवेल गुंडाळून ठाकरेंच्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना चिडवले. यावरून संजय गायकवाड यांची जीभ घसरली. संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार करताना म्हटले की, "मी ओरिजिनल आहे माझी कॉपी करणं उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही." संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने केलेल्या नक्कल आंदोलनानंतर संजय गायकवाड यांनी दिलेले हे प्रत्युत्तर महत्त्वाचे ठरले आहे. या घटनेमुळे दोन्ही शिवसेना गटांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola