Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण

Continues below advertisement

Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण

अशातच  या आंदोलनांचे पडसाद आज पुण्यात देखील पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावेळी अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली, यावेळी मोठा गोंधळ झाला, बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यासाठी अजित पवारांचे भाषण सुरू होताच अमरावतीच्या शेतकऱ्यांनी जाब विचारला, यावेळी महिला आक्रमक झाल्याचे दिसून आले. पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात अचानक गोंधळ उडाला. बच्चू कडू यांच्या उपोषणावरून आंदोलनकर्ते आक्रमक झालेले दिसले.

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? 

खरं तर सरकारकडून या मागण्यांवर लवकर निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र दिवसेदिवस वेळ जात आहे. 90% कर्जमाफी बद्दल जे सरकार बोलत होतं, ते कधी पर्यंत करणार? मुख्यमंत्री म्हणतात बैठकी घ्या. मात्र त्यावर तोडगा नेमका काय हे ही सरकारनं सांगावे असेही बच्चू कडू म्हणाले. आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहे. पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे, असे समजतंय. मात्र कार्यकर्ते त्यात कुठेही कमी पडणार नाही. असेही बच्चू कडू म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज परत फोन आला, पण मला अजूनही लेखी पत्र मिळालेलं नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की, 16 तारखेपासून मी अन्नत्याग सोबत पाणी सुद्धा पिणं बंद करणार. उद्या 15 तारखेला राज्यभरात चक्काजाम आंदोलन आहे की नाही, त्यावर मी दुपारी बैठक घेऊन निर्णय घेणार. नयना कडू यांचं कालच्या भाषणावर बच्चू कडू म्हणाले की, एक पत्नी म्हणून तो राग आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola