Bacchu kadu On Protest : रोज मरण्यापेक्षा एकदाचं मेलेलं बर, बच्चू कडू आक्रमक

Continues below advertisement

Bacchu kadu On Protest : रोज मरण्यापेक्षा एकदाचं मेलेलं बर, बच्चू कडू आक्रमक

सरकार समिती गठित करणार आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित केलेली नाही. समितीचा अहवाल नेमका किती दिवसात येईल? दिव्यांगांच्या मानधनात नेमकं किती वाढ केलं जाणार, हे ही सरकारनं सांगावं. किंबहुना कार्यकर्त्यांना आमचं आवाहन आहे सरकार आता बोलू लागलं आहे, त्यामुळे 2-3 तास धीर धरावा. मला दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. कारण आता शरीरावर परिणाम होतोय. मात्र हे रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, असे म्हणत माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडूंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे गेल्या सहा दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. तर बच्चू कडू अन्नत्याग उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनस्थळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपोषणस्थळी भेट देणार आहेत. काल(13 जून) अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील बच्चू कडूंची भेट घेतली होती. यावेळी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती बावकुळेंनी केली होती. मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर आणि उपोषणावर ठाम आहेत. बावनकुळेंनी कडूंची मुख्यमंत्र्यांशीही चर्चा घडवून आणली. यावेळी कडूंच्या पत्नी नयना कडू भावनिक झाल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री फडणवीसांनी एक दिवस उपवास करावा आणि मग अमृता वहिनींची काय स्थिती होते ते पहावं, असं आव्हान नयना कडूंनी केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola