Naxal Leadership | नक्षलवाद्यांच्या कोअर टीममध्ये मोठे बदल, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी प्रमुखपदी माडवी हिडिमा
नक्षलवाद्यांच्या कोअर टीममध्ये महत्त्वाचे बदल झाल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या कोअर टीमने देवजीची सरचिटणीसपदी नेमणूक केली आहे. तसेच, पोलिसांविरोधातील लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची जबाबदारी माडवी हिडमा कडे सोपविण्यात आली आहे. या कमिटीमध्ये छत्तीसगढमधील सात आणि महाराष्ट्रातील गडचिरोली अशा आठ जिल्ह्यांतील सशस्त्र ऑपरेशनचा समावेश आहे. छत्तीसगढमधील भूमिपुत्र असलेल्या माडवी हिडमा कडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. छत्तीसगढमध्ये नुकत्याच एका नक्षल कमांडरने आत्मसमर्पण केले होते. त्याच्या चौकशीत सुरक्षा दल आणि छत्तीसगढ पोलिसांना ही माहिती मिळाली आहे. "नक्षलवाद्यांकडून या संदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही." ही महत्त्वाची बाब आहे.