Mumbai Metro 2B | मंडाळे ते चेंबूर डायमंड गार्डन मेट्रो 2 बीचा पहिला टप्पा लवकरच सेवेत
मुंबई मेट्रो 2B च्या पहिल्या टप्प्यातील प्रवासी सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. "या महिन्याअखेर प्रवासी सेवेमध्ये दाखल करण्याचा मार्ग मोकळा झालाय," असे या संदर्भात सांगण्यात आले आहे. मंडाळे ते चेंबूर डायमंड गार्डन या पहिल्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच या मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाश्यांच्या सेवेमध्ये दाखल केला जाईल. डी एन नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिका 23.6 किलोमीटर लांबीची असून त्यावर 19 स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात मंडाळे ते डायमंड गार्डन चेंबूर या 5.3 किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. या टप्प्यामध्ये मंडाळे, मानखुर्द, BSNL, शिवाजी चौक, डायमंड गार्डन ही स्थानके असतील. राज्य सरकारने या प्रकल्पाला गती दिली असून, प्रवाशांना लवकरच या नवीन मेट्रो सेवेचा लाभ घेता येणार आहे.