Naxal Surrender: 'मी गद्दार नाही', Bhupati चं केंद्रीय समितीला व्हिडिओतून प्रत्युत्तर
Continues below advertisement
नक्षलवाद्यांचा जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती (Malojula Venugopal alias Bhupati) आणि त्याच्या साठ सहकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. 'आता परिस्थिती बदललेली आहे, शस्त्र सोडून मुख्य प्रवाहामध्ये या,' असे आवाहन भूपतीने एका व्हिडिओद्वारे केले आहे. १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या या शरणागतीनंतर, नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने शस्त्रबंदीचा प्रस्ताव फेटाळून भूपतीला 'गद्दार' संबोधले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी, १ नोव्हेंबरला जिल्हा पोलिसांच्या मदतीने एक चित्रफीत प्रसिद्ध करून भूपतीने सर्व आरोप फेटाळून लावले आणि चळवळीतील सक्रिय नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement