Nawab Malik on Ashish Shelar : आशिष शेलारांचा 'तो' फोटो मी तुम्हाला देतो : ABP Majha
Continues below advertisement
अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्रिपुरातील अल्पसंख्याक समुदायावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी मालेगाव, नांदेड आणि अमरावती येथे रझा अकादमीच्यावतीने मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चा दरम्यान दगडफेकही झाली होती. या घटनेनंतर रझा अकादमीचे नाव चर्चेत आले होते. या रझा अकादमीच्या कार्यालयात भाजप आमदार आशिष शेलार काय करत होते, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला. तर, आशिष शेलार यांनीही मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही असे आव्हानच आशिष शेलार यांनी मलिकांना दिले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Nawab Malik Amravati Ashish Shelar Amravati Riots Nawab Malik On Amravati Riots Amravati Nawab Malik On Ashish Shelar