Nawab Malik यांचा नवा खुलासा, whatsapp चॅट केलं पोस्ट; म्हणाले काशिफ खानची चौकशी का नाही? ABP Majha

Continues below advertisement

Mumbai Cruise Party : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरु केली. समीर वानखेडे यांच्या कारवाईवर मलिक यांनी सातत्यानं आक्षेप घेत पुरावे सादर केले. पत्रकार परिषदांमधून मलिकांनी समीर वानखेडे आणि भाजपावर सातत्यानं निशाणा साधलाय. नवाब मलिक यांनी ट्विट करत आज पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलाय. नवाब मलिक यांनी के.पी गोसावी आणि एका दिल्लीच्या व्यक्तीच्या संभाषणाचं व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय. तसेच पुन्हा एकदा काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्या संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. 

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे, के. पी गोसावी आणि काशिफ खान यांच्यावर निशाणा साधला. ट्विटमध्ये त्यांनी गोसावी आणि एका व्यक्तीमध्ये काशिफ खान संदर्भात झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय. ट्विटमध्ये मलिक म्हणतात की, हे आहे के.पी. गोसावी आणि खबरी यांच्यामध्ये काशिफ खानबद्दल झालेलं संभाषणाचं व्हॉट्सअप चॅट. काशिफ खानला प्रश्न का विचेरले जात नाहीत. काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यातील संबध काय? असे प्रश्न मलिक यांनी उपस्थित केलेय. तसेच व्हॉट्सअप संभाषणाचा स्क्रीनशॉटही पोस्ट केलाय. 

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी सातत्यानं एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. तसेच वानखेडे यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचाही आरोप केला. समीर वानखेडे आणि भाजप यांच्यातील संबधावरही मलिकांनी अनेकदा वक्तव्य केली आहेत. मुंबई क्रूज पार्टी प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram