'क्रुझवरील पार्टीतून दोघांना सोडलं! त्यातला एक BJP नेत्याचा मेहुणा', नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

Continues below advertisement

मुंबई : NCP विरुद्ध NCB हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. क्रुझवरील पार्टीतून दोघांना सोडलं असल्याचा आरोप मलिक यांनी केला असून एक भाजप नेत्याचा मेहुणा होता असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. याबाबत उद्या मी खुलासा करणार आहे, असंही मलिक यांनी म्हटलं आहे. 

नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट दिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की 8 ते 10 लोकांना पकडले आहे.  त्यावेळी मी प्रश्न विचारला होता की, एक अधिकारी संपूर्ण कारवाई करतोय तो असे अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो. जर 10 लोकांना पकडले असेल तर कदाचित 2 लोकांना सोडलं असेल. आता हे खरं असल्याचं समोर आलं आहे. जे दोघे सोडण्यात आले, त्यामध्ये भाजपचे एका नेत्याचा मेहुणा त्यामध्ये होता. त्याबाबत उद्या मी खुलासा करणार आहे, असंही ते म्हणाले.मलिकांनी म्हटलं की, त्या दोन लोकांना आणण्यात आलं होतं आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. मलिक म्हणाले की, भ्रष्टाचार मुक्त करणे म्हणजे भाजपच्या गंगेत डुबक्या मारणे असं आहे का? कुठल्या नेत्याने किती बँका बुडावल्या आहेत ते आता मी बाहेर काढणार आहे, असंही ते म्हणाले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram