दादा, तुम्हीच करून दाखवलं, Chipi Airport बाहेर राणे समर्थकांची पोस्टरबाजी, शिवसेना उत्तर देणार?
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
08 Oct 2021 09:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमातळावरून पुन्हा एकदा श्रेयवाद पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा येत्या 9 ऑक्टोबरला आहे. दोन दिवस शिल्लक असताना श्रेयवाद पुढे आला आहे. सिंधुदुर्गात पुन्हा एकदा चिपी विमातळाच्या निमित्ताने राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होण्याचं चित्र आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पोस्टरबाजीनं याला सुरुवात झाली आहे.