Nawab Malik Hearing : नवाब मलिकांच्या जामिनावरील पुढील सुनावणी 6 जानेवारीला, नाताळही तुरुंगात जाणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.  नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर 6 जानेवारीला सुनावणी होणार आहे... पुढील सुनावणीत ईडीला उत्तर सादर करण्याचेे आदेशही उच्च न्यायालयाने दिले. याचिकाकर्ता रुग्णालयात असताना जामिनासाठी घाई का?, मलिकांची वैद्यकीय अवस्था गंभीर असेल तरच  तातडीची सुनावणी घेऊ असं हायकोर्टाने म्हटलंय. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने कथित गैरव्यवहार प्रकरणी जामीन फेटाळला होता. यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आज मलिकांच्या जामिनावर सुनावणी झाली. मात्र, आज नवाब मलिकांना दिलासा मिळू शकला नाही. पुढील सुनावणीत काय होते? ईडी नेमके काय उत्तर देते? याकडे आता अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola