Nawab Malik UNCUT: माझ्याविरोधात कट आखणाऱ्या केंद्रीय अधिकाऱ्यांची Amit Shah यांच्याकडे तक्रार करणार

Continues below advertisement

Nawab Malik Latest Updates : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एक खळबळजनक आरोप केला आहे. माझ्यावर अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुखांप्रमाणे माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबत केला जात आहे, असं मलिक म्हणाले. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तक्रार करणार

मलिक यांनी म्हटलं की, अनिल देशमुख यांच्याप्रमाणे मला अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे. तसे पुरावेचं माझ्या हातात लागले आहेत. काही अधिकारी लोकांना माझ्या विरुद्ध मसुदा तयार करून इमेल करत आहेत. आणि त्यांना माझ्या विरुद्ध तक्रार करायला लावत आहेत. त्यामुळे मी याविरोधात मी कमिशनर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील तक्रार करणार आहे. आशा तक्रारींची चौकशी करायला लावणार आहे, असं मलिक यांनी म्हटलं आहे. 

मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की,  गेले 2 महिने मला काही लोकं माहिती देत होते की काही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या घराची आणि ऑफिसची माहिती घेत आहेत. माझ्या नातवांची देखील माहिती घेण्यात येत आहेत. ते कुठं शाळेत जातात यावर देखील त्यांचं लक्ष आहे. मी दुबईला असताना दोन जण माझ्या घरचे फोटो काढत होते. हे करत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडलं आहे, असं मलिक म्हणाले. या प्रकरणी मी पोलिसांना तक्रार देणार आहे आणि सीपी यांना देखील पत्र लिहिणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram