Nawab Malik : गांधीजींना खलनायक घोषित करण्याचं कट कारस्थान देशात सुरू आहे

मुंबई : कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे विधीमंडळात पडसाद पडले आहेत. कालीचरण महाराज यांच्यावर कडक कारवाई करावी, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. महात्मा गांधी यांचा केलेला अपमान सहन करणार नसल्याचे मलिक म्हणाले. तर याबाबत माहिती घेऊन सक्त कारवाई करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मलिक यांच्याबरोबरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही कालीचरण महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचे पाप कालीचरण महाराज यांनी केले आहे. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पटोले यांनी केली आहे. तर ज्यांचा संपूर्ण जगाने स्विकार केला, ज्यांनी अंगावर वस्त्र न घालता देशासाठी काम केले, अशा महामानवाबद्दल अपशब्द वापरणे चुकीचे असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. सभागृहाने एकमत करुन कालीचरण महाराज यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करावी, असे वडेट्टीवार म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola