Narayan Rane : पालकमंत्री म्हणून Anil Parab यांना पोलिसांशी चर्चा करण्याचा अधिकार : Nawab Malik
रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी नारायण राणेंच्या अटकेचे आदेश दिले, असा आरोप भाजप नेत्यांनी व्हिडीओच्या आधारे केलाय. या प्रकरणी शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीनंही अनिल परब यांचं समर्थन केलंय. अनिल परब जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा त्यांना अधिकार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी परब यांची पाठराखण केलीय.