Nawab Malik Ajit Pawar : नवाब मलिक यांचा कमबॅक... अजित पवार यांच्यासह एकाच मंचावर!

Continues below advertisement

Nawab Malik and Ajit Pawar NCP, मुंबई : राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आता अजित पवार यांची ही जनसन्मान यात्रा मुंबईत पोहोचणार आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या यात्रेमध्ये आणि राष्ट्रवादीच्या स्टेजवर माजी मंत्री नवाब मलिक उपस्थित राहणार आहेत. काही महिन्यांपूर्वी नवाब मलिकच्या (Nawab Malik) यांच्या महायुतीतील प्रवेशावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा विरोध डावलून नवाब मलिक राष्ट्रवादीच्या स्टेजवर उपस्थित राहणार आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उद्या मुंबईत 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उद्या मुंबईत पोहोचणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार झिशान सिद्धकी यांच्या वांद्रे पूर्व मतदारसंघ आणि नवाब मलिक यांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघात रॅलीच आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली सभा मैदान क्रमांक 5 वांद्रे शासकीय वसाहत खेरवाडी येथे बाबा सिद्दीकी यांच्या नेतृत्वात पार पडणार आहे. तर दुसरी सभा अणुशक्तीनगर मतदारसंघातील चंदन लाँन्स देवनार चेंबूर येथे नवाब मलिक यांच्या नेतृत्वात पार पडणार आहे.  नवाब मलिक उद्या पहिल्यांदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर अधिकृत रित्या पाहायला मिळणार आहेत तर दुसरीकडे काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावणार का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. सिद्दकी अजितदादांसोबत गेले तर काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसू शकतो. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram