Nawab Malik File Nomination : नवाब मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार की अपक्ष, गूढ कायम?

Continues below advertisement

Nawab Malik File Nomination : नवाब मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार की अपक्ष, गूढ कायम?
अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला असल्याची माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांच्यावर दाऊदच्या हस्तकाशी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांना सोबत घेण्यास आणि आता विधानसभेला त्यांना उमेदवारी देण्यास भाजपचा स्पष्ट विरोध होता. त्यामुळे अजित पवार गटाकडून अद्याप नवाब मलिक यांच्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, नवाब मलिक यांना अजित पवार गटाने (Ajit Pawar Camp) एबी फॉर्म देऊन ठेवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा एबी फॉर्म उमेदवारी अर्जाला जोडण्याबाबत नवाब मलिक यांना अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच नवाब मलिक हे आपल्या उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म जोडतील. अन्यथा शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्यावर नवाब मलिक ठाम आहेत. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे थोड्याचवेळात नवाब मलिक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील की नाही, हे स्पष्ट होईल.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram