
Nawab Malik: नवाब मलिकांच्या हाती NCB विरोधात मोठा पुरावा? कथीत ऑडीओ क्लिप ABP माझाच्या हाती ABP Majha
Continues below advertisement
नव्या वर्षात नवाब मलिकांनी एनसीबीवर नव्या आरोपांची तोफ डागलीय.. एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना मुदतवाढ मिळावी म्हणून महाराष्ट्र भाजपचा बडा नेता दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा दावा मलिकांनी केलाय. त्यामुळं हा नेता कोण या चर्चांना उधाण आलंय. मागच्या तारखांच्या पंचनाम्यावर सह्या करण्यासाठी समीर वानखेडे आणि एनसीबीचे अधिकारी दबाव टाकत असल्याचा गौप्यस्फोटही मलिकांनी केला. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पंच आणि समीर वानखेडे यांच्यातील कथित फोन संभाषणही एकवलं. दरम्यान मुख्य आरोपींना सोडून फक्त जावई समीर खानविरोधातच अपील का करण्यात आलं असा प्रश्न मलिकांनी उपस्थित केला. पीआर एजन्सीवर लाखो रुपये खर्च करून बातम्या पेरल्या जात असल्याचा नवाब मलिकांचा आरोप आहे..
Continues below advertisement
Tags :
BJP Nawab Malik NCB Claims BJP Sameer Wankhede Cannon Of Allegations Divisional Director Extension Lobbying