Navratri Garba उत्सवात आयोजकांनी फक्त हिंदू धर्मीयांनाच प्रवेश द्यावा, विश्व हिंदू परिषदेची मागणी

Continues below advertisement

नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय... याच नवरात्रोत्सवात गरब्या आकर्षण असतं.. त्याच गरब्यात आयोजकांनी फक्त हिंदू धर्मीयांनाच प्रवेश द्यावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केलीय. गरब्याचं आयोजन करणाऱ्या मंडळांनी प्रवेश करणाऱ्यांचं आधार कार्ड तपासावं असंही विश्व हिंदू परिषदेनं म्हटलंय..  गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय असून ते फक्त नृत्य नाही, तो इव्हेंटही नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी देवीबद्दल श्रद्धा नसलेल्या, भक्ती नसलेल्यानी प्रवेशच करू नये. तिथे फक्त हिंदू धर्मियांनी प्रवेश करावे असे मत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केलंय.. गेल्या काही वर्षांपासून गरबा सणात फक्त हिंदू धर्मियांनाच प्रवेश देण्यात यावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून केली जात आहे. गरब्याच्या कार्यक्रमात इतर धर्मिय लोक प्रवेश करतात आणि त्यामुळे लव्ह जिहाद प्रकरणे घडतात असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात आहे. 
भाजप आमदार नितेश राणेंनीही याचं समर्थन करत पाठिंबा दिलाय.. गरबा उत्सवाच्या वेळीच लव्ह जिहादचे प्रकार वाढतात असा आरोप नितेश राणेंनी केलाय.. त्यामुळे गरबा आणि त्याच्या प्रवेशाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.. तुर्तास वेळ झालीय आजच्या भागात इथंच थांबण्याची.... उद्या पुन्हा भेटुयात नव्या विषयांसह.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram