ABP News

Navratri Amravati : अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात, मंदिराला आकर्षक रोषणाई

Continues below advertisement

विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबा देवी संस्थानमध्ये आज पासुन शारदीय नवरात्र उत्सवाला सुरवात झाली असून पहाटे 5 वाजेपासुन दर्शनासाठी भविकांची मोठी गर्दी दिसृन येत आहे.. यावेळी अंबादेवी आणि एकविरा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. आज पहाटे 5 वाजता या अंबादेवी मंदिरात घटस्थापना झाली असून विधिवत पूजन करण्यात आलं.. नऊ दिवस अंबादेवी संस्थान परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते.. विशेष म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून शेकडो भाविक शहराच्या विविध भागातून पायी चालत अनवायी पायाने देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने नवरात्रोत्सव काळात पहाटेपासूनच अमरावती शहर मंदिर परिसर अगदी गजबजून गेलं आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram